ज्यो बायडन यांनी ऋषी सुनक यांचे केले अभिनंदन

वॉशिंग्टन, २६ ऑक्टोबर २०२२: अमेरिकेचे पंतप्रधान ज्यो बायडन यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल फोन करुन त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांनी ऋषी सुनक यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छादेखील दिल्या.

यावेळी दोन्ही देशांनी एकत्र काम करणे किती गरजेचे आहे, हे स्पष्ट केले. तसेच रशियाला थांबवणे आणि युक्रेनला पाठिंबा देणे गरजेचे असल्याचे नमूद केले. ब्रिटन आणि अमेरिका यांच्यात एक दुवा निर्माण होण्याची गरज आहे. जेणेकरुन त्यामुळे दोन्ही देशांचे नाते भरभक्कम होण्यास मदत होईल. अशा संदर्भातले फोनवरुन बायडन यांनी सुनक यांच्याशी संभाषण केले. तसेच त्यांना दिवाळीच्यादेखील शुभेच्छा दिल्या.

यावर प्रतिउत्तर देताना ऋषी सुनक यांनी सांगितले की, मी देखील या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर आपण एकत्र काम करत नक्कीच पुढे जाऊ, असंही त्यांनी बायडन यांना सांगितले. तसेच रशिया आणि युक्रेनच्या संदर्भात युक्रेनच्या बाबतीत आपण महत्त्वपूर्ण आणि प्रमुख भूमिकेत असण्याचा नक्कीच प्रयत्न करु. असेही त्यांनी सांगितले.

अमेरिका आणि ब्रिटन यांच्या मैत्रीमुळे नक्कीच रशिया-युक्रेनबाबत महत्वाचा निर्णय होईल, असा विश्वास संपूर्ण जगाला वाटत आहे. त्यामुळे जगाच्या दृष्टीने ही मैत्री नक्कीच महत्त्वाची आणि यशस्वी ठरेल, असे मत जगातून व्यक्त होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा