शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्याबाबत अग्रिमा जोशुआने मागितली माफी

मुंबई, दि. ११ जुलै २०२०: स्टॅन्ड अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने शिवाजी महाराजां बद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. शिवाजी महाराजांबद्दल बोलताना तिने त्याला विनोदातमक वळण दिले होते. हा व्हिडिओ तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता त्यानंतर समाज माध्यमांमध्ये तसेच शिवभक्तांना कडून तीव्र निषेध करण्यात आला होता. अग्रिमा जोशुआ वर कारवाई करण्याबाबत शिवभक्त तसेच काही राजकीय नेत्यांनीदेखील मागणी केली होती. मनसेनंही विरोध करत संबंधित स्टुडिओची तोडफोड केली. या वादानंतर आता तो वादग्रस्त व्हिडीओसुद्धा हटवण्यात आला आहे.

मागितली माफी

यानंतर आता तिने या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे व हा व्हिडिओ सोशल मीडिया वरून तिने काढून टाकला आहे. याबाबत माफी मागताना तिने एक ट्विट केले आहे. त्यात ती म्हणाली की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरून अनेकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी सर्वांची माफी मागते. महाराजांचा मी आदर करते आणि त्या व्हिडीओबद्दल मी मनापासून माफी मागते. तो व्हिडीओ हटवण्यात आला आहे’.

काय आहे प्रकरण

आपल्या स्टँड अप कॉमेडी शो मध्ये अग्रिमा जोशुआने प्रेक्षकांसमोर शिवाजी महाराजांबद्दल गमतीशीर वक्तव्य केले होते. यामध्ये तिने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख देखील केला होता. या शोमध्ये ती म्हणाली की, “मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी इंटरनेटवरील सर्वात विश्वासार्ह साईटवर गेले आणि ती म्हणजे क्वोरा. मला तिथे एकाने लिहिलेला भलामोठ्या आकाराचा निबंध सापडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवाजी पुतळा मास्ट्ररस्ट्रोक आहे. यामुळं महाराष्ट्राचं भलं होईल असं या निबंधामध्ये लिहिलं होतं. तर दुसऱ्या एकाला वाटलं की इथ क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट सुरु आहे. म्हणून त्याने तिथे, या स्मारकात जीपीएस ट्रॅकरसुद्धा असणार स्मारकाच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जिच्या माध्यमातून अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्म केला जाईल. तर एकाने तिथे येऊन तुमची माहिती नीट करुन घ्या आणि शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, असं लिहिलं होतं… मी याच शेवटच्या व्यक्तीला फॉलो केलं.”

तिसऱ्या वक्तव्यानंतर अनेक शिवभक्तांनी या व्हिडिओचा विरोध करत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याबरोबरच शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी देखील तिच्यावर कारवाई करण्याबाबत एक पत्र लिहिले. सर्व स्तरावरून होत असलेला विरोध पाहता तिने अखेर आज या प्रकरणी माफी मागत हा वादग्रस्त व्हिडीओ काढून टाकला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा