श्रीगोंदा, २३.जून.२०२०: शहरातील काही भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. राशीन येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या श्रीगोंदा शहरातील साळवन देवी परिसरातील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे मिळालेल्या अहवालातून स्पष्ट झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार महेंद्र माळी यांनी श्रीगोंदा शहरातील काही भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील काही व्यक्ती राशीनच्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्या होत्या.
या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १० जणांचे अहवाल तपासण्यात आले. त्यापैकी ८ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर २ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून या कोरोनाबाधित रुग्णांपैकी एक पुरुष एक महिला असून यामुळे श्रीगोंद्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी साळवन देवी परिसर १९ जून ते ७ जुलै या १४ दिवसांसाठी सील केले असून श्रीगोंदा शहर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष