कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी केले आत्मक्लेश आंदोलन

3

लातूर, दि.२७ मे २०२०: लातूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक (जुक्टा) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२६) रोजी सकाळपासून दिवसभर आपल्या घरासमोर आत्मक्लेश व अन्नत्याग आंदोलन केले.

महाराष्ट्र शासनाने मागण्या मान्य कराव्यात, यासाठी सविनय मार्गाने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील ९०० अनुदानित व विनाअनुदानीत प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. संघटनेने मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना देण्यात आले.

विनाअनुदानित घोषित कनिष्ठ महाविद्यालय १४६ व १६३८ महाविद्यालयांचा मंजूर निधीचा वितरणाचा आदेश काढावा, मंत्रालय स्तरावर अघोषित महाविद्यालयांना घोषित करून अनुदान आदेश काढावा, वाढीव पदांना मान्यता महाविद्यालयीन द्यावी, आय.टी. विषयाला अनुदान द्यावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, अतिरिक्त विषयाला अनुदान द्यावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा