छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात आमदार निधीतून होणाऱ्या कामाकडे कनिष्ठ कार्यकारी अभियंत्याचे दुर्लक्ष

55

छत्रपती संभाजीनगर, १४ ऑक्टोंबर २०२३ : छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या आमदार निधीतून होणाऱ्या कामाकडे, कनिष्ठ कार्यकारी अभियंता यांचे सर्रास दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कारण जिल्ह्यातील प्रमुख मार्ग असणाऱ्या साखरवेल ते करंज खेड या रस्त्या वरती २६.११ लक्ष खर्च करून तयार होणाऱ्या पुलाचे काम पूर्णतः निकृष्ट दर्जाचे होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. असा आरोप जन सामान्यांनी केलाय.

कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी परवाच आम-सभा आयोजित करून जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्त्याच्या कामासंदर्भातील समस्या जन माणसांनी त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या. परंतु तरीसुद्धा जे होणारे काम आहे ते अजूनही निकृष्ट दर्जाचेच का होतंय? असा प्रश्न आम जनतेला पडला आहे.अजूनही सुधारणा होतानी दिसून येत नाही. साखरवेल ते करंज खेड या रस्त्या वरती होणाऱ्या पुलाच्या रोड भरणा साठी चक्क मातीचा वापर करून दिशाभूल केली जात आहे. वारंवार अभियंता यांना तक्रार करूनही त्यात दुरुस्ती होत नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि रस्त्याचे दर्जेदार काम व्हावे ही नागरिकांची मागणी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रविंद्र खरात