मुंबई : “जर्सी” चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता शाहिद कपूर गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या चेहऱ्यावर १३ टाके पडल्याचे वृत्त आहे.
चंदीगडमध्ये ‘जर्सी’ या चित्रपटातील एका दृश्याचे शुटिंग करत असताना शाहिदच्या चेहऱ्यावर बॉल लागून त्याच्या ओठाला दुखापत झाली आहे. तसेच हनुवटीलाही मार लागला आहे. शाहिदला दुखापत झाल्याचे समजताच त्याची पत्नी मीरा कपूर चंडीगडला रवाना झाली आहे.
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननौरी करत आहेत. तर निर्मिती अमन गिल करत आहेत. त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.