ज्वारी आरोग्यासाठी लाभदायक…

आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर गहू आणि इतर धान्यापेक्षा ज्वारी ही पचायला हलकी आणि आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे आठवड्यातले दोन दिवस तरी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा.

रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात हार्मोन्सचं प्रमाण कमी-जास्त होते. अशा वेळेस महिलांनी आहारात ज्वारीचा समावेश करावा. आहारात ज्वारीचे पदार्थ असतील तर स्तनाचा कर्करोग होत नाही, असं संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे.

ब्लडप्रेशर व हृदयासंबंधित आजार सध्या ब्लडप्रेशर आणि हृदयासंबंधित आजारांच्या समस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे सेवन गरजेचे आहे.

ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
पोटांच्या सामाशांवर उपयुक्त ठरते. ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना एसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी चपातीऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.

एनिमियाचा त्रास कमी होतो. ज्वारीत भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. एनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.

लठ्ठपणा कमी होतो. सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरते. ज्वारी शरीरातील इन्शूलिनची पातळी प्रमाणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी ठरते.

किडनी स्टोनचा त्रास कमी होतो. ज्वारीत असणारी पोषक तत्व किडनी स्टोनला आळा घालतात. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होणाऱ्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी किंवा इतर स्वरूपातील ज्वारीचे पदार्थांचा आहारात नक्की समावेश करावा.

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. ज्वारीचे सेवन रक्त वाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे तुम्ही ज्वारीची भाकरी खात नसाल तर आहारात ज्वारीच्या भाकरीचा नक्की समावेश करा.

ज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा