गोल पोस्ट राजकारण ज्योतिरादित्य सिंधिया यांचा भाजपात प्रवेश

ज्योतिरादित्य सिंधिया यांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : मध्यप्रदेश काँग्रेसमधून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षात औपचारिक प्रवेश केला. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती समोर येत आहे.

ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात पुढे काय होणार हे स्पष्ट होऊ शकतं. मंगळवारी ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र त्यांनी ट्वीटरवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
हे पत्र ९ मार्चला लिहिल्याचे दिसून येते. “सुरुवातीपासूनच राज्य आणि देशातल्या लोकांची सेवा करणं हे माझ्या जीवनाचं ध्येय होतं. मात्र आता मी काँग्रेस पक्षासाठी हे काम करू शकत नाही असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.असे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version