ट्विटर पेड होणार, आणि एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केले, अशा अनेक चर्चांना उधाण आले. पण त्याच वेळेला ट्विटर व्यवहार स्थगित असे म्हणत , एलन मस्क यांनी या चर्चांना सध्यापूरता पूर्णविराम दिला आहे.
ट्विटरची खरी किती अकाऊंट आहेत, याबाबत शंका असल्याने ही व्यवहार थांबला आहे. तब्बल ४४ अब्ज डॅालरचा हा व्यवहार असून या निर्णयाने जगाच्या आर्थिक उद्योगाला धक्का बसला आहे.
मस्क यांनी ट्विटरवरील बनावट आणि खोटे तसेच बोट अकाऊंटविषयी संशय व्यक्त केला. यावेळी त्यांनी रॅायटर वृत्तसंस्थेला एक लिंक शेअर केली होती. ज्यात त्यांनी बोट अकाउंट जास्त असण्याची शक्यता व्यक्त केली होती. पण याचा संपूर्ण अभ्यास केल्याशिवाय कुठलाही निेर्णय घेणार नसल्याचे तसेच ही व्यवहार कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणार असल्याचे मस्क यांनी नमूद केले आहे.
पण त्यांच्या या निर्णयीने शेअर बाजारात ट्विटरचे शेअर्स सहा टक्क्यांनी घसरले तर टेस्लाचे शेअर सात टक्क्यांनी वाढले. आता ट्विटरचा हा व्यवहार कधी पूर्ण होणार आणि या व्यवहाराचे जागतिक अर्थकारणावर कसा परिणाम होणार , हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस