काली शॅार्ट फिल्म विवादात

पुणे, 7 जुलै 2022: काली चित्रपटाचे पोस्टर लॅान्च झाले आणि त्या पोस्टरवरुन जगभरात हंगामा सुरु झालाय. या पोस्टरमध्ये काली माता स्मोकिंग करताना आणि हातात LGBT चा झेंडा दाखवला आहे. देवदेवतांचा अपमान हा आहे, असा आरोप लीना मणिमेकलाई हिच्यावर करण्यात आलाय. पण एवढ्यावरच न थांबतां या चित्रपटात भूमिका करणाऱ्या शंकर आणि पार्वती यांच्या अभिनेत्यांचे स्मोकिंग करतानाची पोस्टर ट्विटरवर आली. सर्व स्तरातून यावर टीका होत आहे.

यावर ट्विटरने ॲलर्ट होऊन हे पोस्टर काढून टाकलं आहे. पण या संदर्भात आता कॅनडामध्ये पडसाद उमटले आहे. कोर्टात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली असून हिंदू नेत्यांनी याबद्दल कारवाई करण्याची मागणी केलीय.

यावर निर्माती लीना मणिमेकलाई हिने स्पष्टीकरण दिलंय की, ही शॅार्ट फिल्म ही जेव्हा काली माता टोरांटोत रस्त्यावर उतरते आणि तिच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा कसा परिणाम घडतो, हे यात दाखवलं आहे. तसेच अरेस्ट लीना मेखमलीई ऐवजी लव यू लीना अशी पोस्ट करा, असे ही लीनाने पोस्ट केलंय.

यावर हिंदु देवदेवतांचा अशा पद्धतीने अपमान केल्याचा आरोप लीनावर होत आहे. त्यामुळे काली शॅार्ट फिल्म प्रदर्शित न करण्यावर जनता आग्रही आहे.

वास्तविक देवीदेवतांबद्गल अशी कोणतीही अवहेलना, सहन केली जाणार नसून, असं धाडस लीना मेखमलीईने कसं केलं? असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे. संस्कृती जपण्याऐवजी संस्कृतींचा ऱ्हास होत असल्याचे दिसून येत आहे, हे नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी-तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा