लॉक डाऊनच्या काळातील वास्तव मांडणारा “कच्चे दिन” प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे, दि.२३मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौथा लॉकडाऊन करण्यात आला आहे.त्यामुळे चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. तरी ओ टि टी (OTT) प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत. सध्या निर्माण झालेले मजुरांचे प्रश्न आणि लॉकडाऊन मुळे होणारे त्यांचे स्थलांतर याचे वास्तव मांडणारा चित्रपट” कच्चे दिन” हा चित्रपट शुक्रवारी युट्युबर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या चित्रपटातून एका स्थलांतरित टॅक्सी ड्रायव्हरची कथा मांडण्यात आली आहे. मागच्या दोन महिन्यांपासून कोरोनामुळे संपूर्ण देश ठप्प झाला आहे. त्यामुळे सर्वांच्याच पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून मजुरांचे होणारे स्थलांतर याचे वास्तव या चित्रपटातून मांडण्यात आले आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक शैलेंद्र सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात दीपक दोब्रियाल मुख्य भूमिकेत झळकले असून त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात यशपाल शर्मा, अश्रूत जैन, टीना सिंग हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.

काही दिवसांपूर्वीच याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढविली होती. अखेर शुक्रवारी( दि.२२) रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा