कैद्याची मनोरूग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या कैद्याने सोमवारी ( दि.२०) रोजी रात्री रूग्णालयातील एका खोलीत चादरीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील विजयसिंह प्रजापती असे गळफास घेतलेल्या कैद्याचे नाव आहे.
सुनील प्रजापती हा खुनाच्या गुन्ह्यातील कैदी होता. त्याला कुरूडवाडी येथून मानसिक उपचारासाठी १ जानेवारीला येरवडाच्या प्रादेशिक मनोरूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. खोलीमध्ये बंद असताना त्याने त्याच्याजवळ असलेली चादर फाडून गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्याच्या आत्महत्येनं काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा