काकाने केला पुतणीचा निर्घृण खून

56

उत्तर प्रदेश (वृत्तसंस्था) : एकतर्फी प्रेमातून काकाने पुतणी चा निर्घृण खून केला. काका आणि पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार उघडकीस उत्तर प्रदेशातील मैणीपुर येथे समोर आला आहे.यानंतर आरोपीने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. पोलिसांसमोर त्याने आपला गुन्हाही कबूल केला आहे.याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिले आहे

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदनपूर गावात राहणाऱ्या १६ वर्षीय पुतणीवर काकाचे एकतर्फी प्रेम होते. पुतणीसोबतच काका अनिल यादवला लग्नही करायचे होते. पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा याला तीव्र विरोध होता, मात्र काका आपल्या भूमिकेवर ठाम होता. अनेकदा समजूत काढूनही काकाची पुतणीकडे वाईट नजर जात होती.

शनिवारी पीडिता आपली आई आणि बहिणीसोबत आजीच्या घरी जात असतानाच काकाने त्यांना रस्त्यातच गाठले. लग्न करणार की नाही? असा सवाल करत काकाने पीडिता आणि तिच्या आईसोबत वाद घालण्यास सुरुवात केला. पीडितेने तुम्ही माझे काका आहात असे सांगत लग्नास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने पुतणीच्या डोक्यावर गोळी झाडत तिची हत्या केली. नंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

. गोळी लागल्याने जखमी झालेल्या आरोपीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी रुग्णालयातच त्याचा जबाब नोंदवून घेतला. आरोपीने हत्येचा गुन्हा कबूल केला असल्याचे मैनपुरीचे पोलीस अधिकारी अजय कुमार यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा