हैदराबाद: पोलिस अधीक्षक (एसपी), भास्करन यांनी शनिवारी सांगितले की नागार्जुन सागर धरणालगत असलेल्या कालव्यात एक कार खाली पडल्याचे कळाले.१८ ऑक्टोबर रोजी रात्री स्कॉर्पिओ कारमधील सहा जण कोदड भागात एका विवाह सोहळ्याला हजेरी लावून हैदराबादला परत होते. सूर्यपेट जिल्ह्यातील चकीराला गावात नाडियागुडेम मंडळावर पोहोचताच कार चालकाचा ताबा सुटला आणि नागार्जुन सागर धरणाशी जोडलेल्या कालव्यामध्ये पडली .
ते पुढे म्हणाले की, पाण्याचा प्रवाह जास्त आसल्यामुळे कार वाहू लागली, कारमधील सर्व सहा जण अजूनही बेपत्ता आहेत. आम्ही स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आहे. अब्दुल अजीज वय ४५ वर्ष, राजेश २९ वर्ष, जिमसन ३३ वर्ष, संतोष कुमार २३ वर्ष, नागेश ३५ वर्ष व पवन कुमार २३ वर्ष असे सहा जण बेपत्ता आहेत. हे सर्व हैदराबादच्या एएस राव नगरमधील एका खासगी रुग्णालयात कामाला होते.पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की एनडीआरएफलाही परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच बेपत्ता झालेल्या व्यक्तींचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आहेत .