कल्याण – शिळ रस्त्याच्या कामाला अखेर शुभारंभ

डोंबिवली, २८ ऑगस्ट २०२०: कल्याण – शिळ रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाला आता सूरूवात झाली आहे. अनेक दिवसांपासून याच रस्त्यावरून कल्याण डोंबिवलीत राजकारणाला सूरूवात झाली होती. मनसे आणि शिवसेना हा नविन वाद सूरू झाला होता. मात्र अखेर या रस्त्याच्या कामाल आज पासून सूरूवात झाली आहे.

कल्याण-शिळफाटा रस्ता हा कल्याण, डोंबिवली, बदलापूर येथे राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाचा रस्ता आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा रस्ता आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन होते, मात्र आता हळूहळू काही प्रमाणात खाजगी आणि शासकिय कार्यालये सूरू झाली आहेत. त्यामुळे लोकल सेवा नसल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या खाजगी वाहनांनी ये-जा करावी लागत होती. त्यामुळे कल्याण-शिळ रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढू लागली होती. मात्र रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याने नागरिकांना त्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे १५ मिनिटांच्या प्रवासासाठी जवळपास २ तास लागत होते.

मुख्यमंत्री ठाण्यात कोरोना आढावा बैठकीस आले होते तेव्हा त्यांनी या रस्त्याकडे तातडीने लक्ष देण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतर याला एक राजकिय वळण आले होते. मनसे आमदार राजू पाटील आणि खासदार श्रींकात शिंदे यांच्यात ट्विटवर टिकासत्र सूरू होते. अखेर या कामाला सूरूवात झाली. रस्त्याचे माप घेऊन जिथे डांबरीकरण करणं गरजेच आहे तिथे ते करण्यात सूरूवात झाली आहे. मात्र सकाळपासून सूरू असलेल्या पावसामुळे हे काम मध्ये-मध्ये थांबवण्यात येत आहे.

मात्र रस्त्याचे काम हे सूरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाल आहे. त्यामुळे खड्ड्यांच्या रस्त्यातून सूटका होईल अशी आशा बाळगली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा