कमल हसन आणि रजनीकांत राजकारणात एकत्र?

तमिळनाडू, १६ डिसेंबर २०२०: सुपर स्टार रजनीकांत यांनी नुकतेच राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव ऑल इंडिया मक्कल सेवई कटची (ऑल इंडिया पीपल्स सर्विस पार्टी) आहे आणि त्यांच्या पक्षाचे चिन्ह ऑटो आहे. रजनीकांत राजकारणात आल्याने एक प्रश्न उपस्थित राहीला आहे आणि तो म्हणजे ते आभिनेता कमल हसन यांच्या बरोबर हातमिळवणी करणार का?

कमल हसन हे राजकारणात आधी पासूनच ॲक्टिव आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवर बेधडक आपली मते मांडणारे कमल हसन यांना रजनीकांत बरोबर हातमिळवणी बद्दल प्रश्न केले आसता ‘मी त्यांच्या पासून फक्त एक फोन लांब आहे.’ असे त्यांनी उत्तर दिले.

कमल हसन ने या आधी तामिळनाडू मधे पुढच्या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजनीतिक गठबंधनांचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले “जर आमची विचारधारा एकसारखी आणि लोकांच्या हित मधे आसेल तर आम्ही व्यक्तिगत दूरी संपवून एक साथ मिळून काम करण्यासाठी तयार आहे.” कमल हसन पहिल्या पासूनच राजकारणात आले असून त्यांच्या पक्षाचे नाव मक्कल निधि मैय्यम आहे. त्यांनी २०१८ मधे आपला पक्ष काढला आणि लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

तामिळनाडूच्या राजकारणातील कलाकारांचा इतिहास….

तामिळनाडू च्या राजकारणात हे पहिल्यांदा नाही की चित्रपटातील कलाकार राजकारणाच्या जगात पाय ठेवत आहेत. तमिळनाडूतील दिग्गज नेते करुणानिधि आणि जयललिता च्या निधनानंतर प्रदेशाच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि असं म्हणलं जात आहे की ती पोकळी रजनीकांत किंवा कमल हासन भरुन काढू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा