अबब…कानात आढळली दहा झुरळाची पिल्ले

30

बीजिंग : चीनमधील एका व्यक्तीला झोपण्यावेळी उजव्या कानात अतिशय वेदना सुरु झाल्या होत्या . या वेदनेमुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. उपचारावेळी त्याच्या कानात, एक मादी झुरळ आणि झुरळाची तब्बल १०हून अधिक पिल्ले आढळून आली. त्यामुळे कानात अशा प्रकारे झुरळं निघाल्याच्या घटनेने डॉक्टरही अचंबित झाले होते.

याबाबत एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कान दुखत असल्याने २४ वर्षीय ल्वू नावाचा तरुण ग्वांगडोंग प्रांताच्या हुआंग जिल्ह्यातील स्नेह रुग्णालयात आला. रुग्णालयातील ईएनटी (कान, नाक, घसा डॉक्टर) विशेषज्ञांनी सांगितलं की, ल्वूने त्याचा कान अतिशय दुखत असल्याचं सांगितले.
त्याला कानात कोणीतरी ओरखडे मारत, कान खात असल्याचं जाणवत होते. यामुळे त्याला अतिशय त्रास होत असल्याचं, डॉक्टरांनी सांगितले.
ल्वूचा कान तपासल्यानंतर, मला त्याच्या कानात १०हून अधिक झुरळाची पिल्लं सापडली असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.
डॉक्टरांनी ल्वूच्या कानातून, पहिल्यांदा चिमट्याच्या साहाय्याने मोठं झुरळ बाहेर काढले. त्यानंतर एक-एक करुन छोट्या-छोट्या आकाराची पिल्ल बाहेर काढली.

त्या रुग्णालयातील ईएनटी प्रमुख ली जिन्युआन यांनी स्थानिक मीडियाशी बोलताना सांगितलं की, ल्वूला आपल्या अंथरुणाजवळ अर्धवट जेवणाची पाकिटं ठेवण्याची सवय होती. त्यामुळे अशा पदार्थांमुळे झुरळांसारखे जीव आपल्याकडे आकर्षित होत असल्याचं त्यांनी सांगितले.आणि त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा