कांचन कुल यांची महिला जिल्हाध्यक्ष पदी वर्णी

दौंड, १७ ऑगस्ट २०२०: दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी व बारामती लोकसभा उमेदवार कांचन कुल यांची भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. खासदार गिरीश बापट व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत निवडीचा कार्यक्रम पार पडला.

कांचन कुल यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मधून सुप्रिया सुळे यांना प्रखर विरोध करण्यासाठी उभे करण्यात आले होते. संपुर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या बारामती मतदार संघात कांचन कुल यांना पराभव पत्करावा लागला होता, मात्र मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याने कुल यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. दरम्यान राहुल कुल यांना देखील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीने निसटता विजय मिळाला होता.

त्यामुळे दौंड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या उभारणीस नव्याने बळ मिळण्यासाठी या पदाचा वापर होणार असल्याचे बोलले जात आहे.यापुढे राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या समर्थकांना भारतीय जनता पार्टीच्या पदावर काम करण्याची संधी मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा