वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडचे कर्णधारपद केन विल्यमसनकडे, १५ सदस्यीय संघाची घोषणा

नवी दिल्ली, ११ सप्टेंबर २०२३ : न्यूझीलंडने सोमवारी भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी आपला संघ जाहीर केला. न्यूझीलंडने आपल्या संघाची कमान केन विल्यमसनकडे सोपवली आहे. एकदिवसीय विश्वचषक ५ ऑक्टोबरपासून सुरू होईल तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक-२०२३ साठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघाचा कर्णधार केन विल्यमसनने या स्पर्धेद्वारे वनडे फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले आहे. तर वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा उपकर्णधार टॉम लॅथम असेल.

न्यूझीलंडने भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंचाही आपल्या संघात समावेश केला आहे. संघातील ३ फिरकीपटूंपैकी २ भारताचे आहेत. न्यूझीलंडने आपल्या संघात ईश सोधी आणि रचिन रवींद्रचा समावेश केला आहे. ईश सोधी हा पंजाबच्या लुधियानाचा आहे. रचिनचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला असला तरी त्याचे वडील भारतीय आहेत.

आयपीएल २०२३च्या शेवटच्या हंगामातील पहिल्या सामन्यात केन विल्यमसनला दुखापत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून ते आत्तापर्यंत म्हणजे सप्टेंबरपर्यंत तो मैदानापासून लांब आहे.

न्यूझीलंडचा १५ सदस्यीय संघः केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (उपकर्णधार), डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सॅनटर, ईश सोधी, टिम साउथी आणि विल यंग.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा