कंगनाला मुंबई आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही: अनिल देशमुख

मुंबई, ४ सप्टेंबर २०२०: मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर अभिनेत्री कमीना राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेना, मनसे आणि काँग्रेस यांसारख्या पक्षातील नेत्यांनी तिच्यावर चांगल्याच घणाघाती टीका केले आहेत. आता याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ज्यांना मुंबईत रहाणं सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.
     

अनिल देशमुख म्हणाले, “महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड पोलिसांशी केली जाते. आपलं पोलीस दल सक्षम आहे. कोरोनाच्या परिस्थितीत पोलीस दलाने कशाप्रकारे संक्रमण रोखण्यासाठी काम केलं. तुम्ही सर्वांनी हे पाहिलं आहे. हे काम करताना १६५ पोलीस कर्मचारी शहीद झाले. अशावेळी एखादा फिल्मी कलाकार आमच्या पोलिसांविषयी अपमानास्पद वक्तव्य करत असेल तर आम्ही त्याचा धिक्कार करतो.”
     

“कायदा आणि सुव्यवस्थेबाबत संपूर्ण मुंबई, संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांच्या हातात सुरक्षित आहे. ते अशा प्रकारची वक्तव्यं करतात. तसेच मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरक्षित राहणं शक्य नसल्याचं बोलतात. त्यामुळे त्यांना मुंबईत आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही,” असंही अनिल देशमुख म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा