कंगना हा विषय आमच्यासाठी संपला: संजय राऊत

मुंबई, १० सप्टेंबर २०२०: मुंबईच्या पाली हिल येथील बीएमसीने कंगना रनौतचे कार्यालय तोडल्यानंतर आता शिवसेनेने मौन बाळगले आहे. शिवसेनेने आता कंगनाशी संबंधित कोणत्याही विषयांना प्राधान्य न देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार रात्रीपासून असे निदर्शनास येत आहे. दरम्यान, शिवसेनेचे प्रवक्ते आणि कंगनाच्या सोबतच्या लढाईचे मुख्य पात्र असलेले संजय राऊत यांनी सांगितले की, कंगनाचा भाग शिवसेनेसाठी संपला आहे.

काल झालेल्या बैठकीत कंगनावर निर्णय झाल्याचे बोलले जात होते आणि आज कंगणाचा विषय ठाकरे सरकारकडून थांबल्याचे दिसत आहे. गुरुवारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राऊत माध्यमांशी बोलले. या संभाषणादरम्यान मीडियाने त्यांच्यावर कंगना रनौतबद्दल विचारणा केली, तर राऊत यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले. राऊत म्हणाले, “कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही ते विसरुन गेलोय. आम्ही आमच्या नेहमीच्या सामाजिक, राजकीय कामाला लागलोय. ती काय ट्विट करतेय, ते वाचले नाही. आम्ही फक्त सामना वाचतो. ”उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात काय झाले या प्रश्नावर राऊत म्हणाले की, पक्षाशी संबंधित कामांच्या संदर्भात मी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती”.

तसेच “कंगना प्रश्नी काहीही बोलायचे नाही, असा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पक्षासंदर्भात चर्चा झाली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नाराज असल्याची अफवा पसरवू नका,” असं काहीही नाही,” असे संजय राऊत म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा