‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा टिझर लॉन्च, हुबेहूब इंदिरा गांधी दिसतेय कंगना

मुंबई २५ जून २०२३: कंगनाची मुख्य भूमिका असलेल्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही कंगनाच करत असुन चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेनेही, चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. इमर्जन्सी चित्रपटात कंगना भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनानं हा चित्रपट २४ नोव्हेंबर २०२३ ला मोठ्या पडद्यावर रिलीज होणार असल्याचे सांगितलेे.

काही दिवसांपूर्वी कंगनाचा या भूमिकेसाठीचा फर्स्ट लूक समोर आला होता, तेंव्हापासूनच चाहत्यांची उत्सुकता वाढलेली, त्यात आता आलेल्या या टिझरमुळं, चाहत्यांमध्ये आता चित्रपटाबाबत आणखी उत्सुकता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या टिझरमध्ये कंगनाची डायलॉग डिलिव्हरी आणि एकूणच सादरीकरण याचं चाहत्यांकडून कौतुक केलं जातय. या भूमिकेसाठीे कंगनाने बरीच मेहनत घेतल्याचं दिसतंय.

चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रनोट स्वतः करत असून निर्मातीही तीच आहे. पटकथा रितेश शहा यांनी लिहिली आहे. कंगनासह चित्रपटात दिवंगत अभिनेते सतीश कौशिक, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि मिलिंद सोमण मुख्य भूमिकेत आहेत.

देशाच्या इतिहासातील महत्त्वाची घटना असलेल्या आणीबाणीबाबत भारतातील तरुणांना माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. ही एक महत्त्वाची घटना असून मोठ्या पड्यावर ती सादर करण्यासाठी अत्यंत उत्साही असल्याचं यावेळी कंगनानं म्हटलंय. देशभरात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला ४८ वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेखही या व्हिडिओमध्ये करण्यात आलाय.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा