मुंबई, ३१ मे २०२१: आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कंगनाच्या वैयक्तिक अंगरक्षकाला अटक करण्यात आलीया. कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक कुमार हेगडेला मुंबई पोलिसांनी कर्नाटकात जावून अटक केलीया. हेगडेला बलात्कार आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता. मुंबई पोलिसांनी त्याला त्याच्या गावात जावून अटक केली. पोलीस जेव्हा कुमार हेगडेच्या गावात गेले तेव्हा तो त्याच्या लग्नाची पत्रिका वाटत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली.
पीडित महिला एक ब्युटिशियन आहे. कुमार हेगडे बऱ्याच दिवसांपासून संपर्कात न आल्यानं तिनं अखेर पोलिसांकडं जावून आपली व्यथा मांडली. मुंबईचे डीएन नगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. त्याला सध्या कर्नाटकातून महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजे हेगडेने आई आजारी असल्याचा बहाणा करुन ५० हजार रुपये घेतले. पण ते परत केले नाहीत, असाही आरोप पीडितेनं केलाय. तसंच त्यानं लग्नाचं आमिष दाखवून जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला, असाही आरोप महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केलाय.
पीडित महिला हेडगेला आठ वर्षापासून ओळखत आहे. दोघांच्या सुरुवातीच्या भेटीपासून ते अलीकडच्या काळातील भेटी पर्यंत ची सर्व माहिती तिनं पोलिसांना दिलीय. गेल्यावर्षी जून महिन्यात कुमार हेगडेनं तिला लग्नासाठी विचारलं होतं. पीडितेनं तेव्हा भावनेच्या भरात होकार दिला होता. त्यानंतर आई आजारी असल्याचं सांगून कुमार कर्नाटकला निघून गेला. तसेच त्यानं पीडितेकडून आईच्या उपचारासाठी पैसे हवेत असं सांगून ५० हजार रुपये घेतले. पण त्यानंतर तो एकदाही संपर्कात आला नाही, असा आरोप पीडितेनं केलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे