बिहार काँग्रेसची जबाबदारी पडणार कन्हैया कुमारच्या खांद्यावर! राहुल गांधी करणार का शिक्कामोर्तब?

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2022: बिहारमध्ये राजकीय संकटातून जात असलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या सक्रिय करण्याची कसरत सुरू झालीय. बिहार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा यांच्या राजीनाम्यानंतर नव्या अध्यक्षाबाबत चर्चांना उधाण उठलं आहे. दरम्यान, एक बातमी समोर आलीय, ज्याची माहिती कळताच काँग्रेसची वर्षानुवर्षे सेवा करणारे नेतेही अस्वस्थ झाले आहेत.

बिहार काँग्रेसची कमान कन्हैया कुमारच्या हातात जाऊ शकते, असं मानलं जात आहे. बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसचा मार्ग वेगळा आहे. याचं एक कारण कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये सामील होत असल्याचेही सांगितलं जात आहे. राहुल गांधींनी हा निर्णय घेतल्यास कन्हैया कुमार हा बिहार काँग्रेसचा अध्यक्ष होईल, असं जाणकारांचं मत आहे.

काँग्रेसला भूमिहार जातीला आपल्या बाजूला करायचंय

बिहारच्या राजकीय पंडितांच्या मते कन्हैया हा भूमिहार जातीतून आलाय. बिहारमध्ये काँग्रेसला भाजपला आव्हान द्यायचं असंल, तर कन्हैया कुमारशिवाय पक्षाकडे पर्याय नाही. कन्हैयाच्या आगमनामुळे सध्या भाजपच्या दरबारात असलेले बिहारमधील भूमिहार तरुण काँग्रेसच्या दिशेने येऊ शकतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत ही नावं पुढं

कन्हैया कुमार हा बिहार काँग्रेसचा अध्यक्ष असंल, यावर राज्यातील राजकारणी सध्या तरी वक्तव्य करणं टाळत आहेत. दरम्यान, बिहार काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आणखी अनेक जण पुढे आहेत. सदाकत आश्रमा यांचं नावही चर्चेत आहे. यासोबतच दलित जातीतून आलेल्या मीरा कुमार यांचंही नाव बिहार प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढं मानलं जातंय. त्याचबरोबर दलित नेत्यांमध्ये तारिक अन्वर, आमदार राजेश कुमार आणि विधिमंडळ पक्षाचे माजी नेते अशोक राम यांचीही नावं घेतली जात आहेत.

मुस्लिम समाजाबद्दल बोलायचं झालं तर शकील अहमद खान यांचे नाव आघाडीवर आहे. शकील खान हे सध्या पक्षाचे आमदार आहेत. तसं, नावांच्या चर्चेदरम्यान अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाच्या नावावर येते, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा