कन्हैयालालच्या मारेकऱ्यांना कोर्टात हजेरी लावताना मारहाण, व्हिडिओ

नवी दिल्ली , 3 जुलै 2022: राजस्थानमधील उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल यांच्या हत्येशी संबंधित चार आरोपींना काल सुरक्षा व्यवस्थेत एनआयए न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टात हजेरी सुरू असताना संतप्त लोकांनी आरोपींवर हल्ला केला. न्यायालयाने या चारही आरोपींना 12 जुलैपर्यंत एनआयए कोठडी सुनावलीय. याआधी उदयपूर येथील न्यायालयाने शुक्रवारी दोन आरोपींना एक दिवसाच्या ट्रान्झिट रिमांडवर पाठवलं होतं.

न्यायालयात हजर असताना मारहाण

जयपूर येथील एनआयए न्यायालयात नेत असताना आरोपींवर हल्ला करण्यात आला आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र असे असतानाही आरोपींना लोकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. सुरुवातीला सुमारे 5 तास सतत घोषणाबाजी करण्यात आली. वकिलाने फाशीची मागणी करत कोर्टात प्रवेश केल्यावर सुनावणी कक्षाचा दरवाजा बंद करावा लागला, मात्र बाहेर आल्यावर आरोपीला शूज, चप्पल आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली, पोलिस आरोपीला गाडीपर्यंत नेत असतानाही लोकांनी बेदम मारहाण केली.

मारहाणीचा व्हिडिओ आला समोर

आरोपींच्या मारहाणीचा व्हिडिओही समोर आलाय. पोलिसांच्या गाड्यांमध्ये बसवलं जात असतानाच पोलिसांच्या बंदोबस्तात पाठीमागून आलेल्या लोकांनी त्यांना मारहाण केल्याचं यात दिसत आहे. एका आरोपीचा गळा पकडून त्याला मागून मारतानाही दिसत आहे. मात्र, एक एक करून पोलिसांनी त्या चार आरोपींना गाडीत बसवलं. पोलिसांनी त्यांना कसेतरी ओढून गाडीत बसवलं आणि पाठवलं. या आरोपींना हजर करण्यापूर्वीच येथे उपस्थित वकिलांनी आरोपींना फाशीची मागणी करत घोषणाबाजी केली होती, असं सांगण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा