मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्मा याला कोण ओळखत नाही एका वाहिनीवर त्याचा एक लोकप्रिय कार्यक्रम येतो ज्यात सर्व सेलिब्रिटी येत असतात. येणारा नवीन सिनेमा या कार्यक्रमात प्रामोट केला जातो. परंतु सध्या कपिल शर्मा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात तो सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता अजय देवगणकडून पैसे घेताना दिसत आहे.
कपिल शर्मानं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो अजय देवगणचा सिनेमा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’चं प्रमोशन करताना दिसत आहे. त्यानंतर अजय देवगण तिथे येतो आणि कॅमेरामनला शूट बंद करायला सांगतो आणि कपिलला काही पैसे देताना दिसतो. कपिलला असं करताना पाहून त्याचे चाहते खूपच हैराण झाले आहेत.