सातारा, दि.२८ मे २०२० : कराड शहरात करोनाचा शिरकाव होणार नाही. या अनुषंगाने विविध उपाय योजना केल्या जात आहेत. नागरिकांचाही त्याला चांगला प्रतिसाद आहे. याच पार्श्वभूमीवर कराड पालिका ‘मी माझा रक्षक’ हे अभियान राबवणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.
शहरात स्वच्छता, आरोग्य या मोहीमा योग्य प्रकारे राबवल्या गेल्या आहेत. लॉकडाऊन व कंटेनमेंट झोनमध्ये कराडकरांची संयमताही महत्वपूर्ण ठरली असून करोनाच्या तीन साखळ्या तोडण्यात यश आल्याचे मत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी व्यक्त केले.
यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, म्हणाले की, जिल्ह्याच्या तुलनेत कराडसारख्या ठिकाणी सर्व शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिक व आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने याठिकाणी लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले आहे. त्यामुळे याठिकाणी परराज्यातून येणाऱ्या लोकांची संख्याही मोठी असल्याने करोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. ही परिस्थिती गृहीत धरून पोलीस प्रशासनाने नगरपालिका व आरोग्य विभागासोबत उपाययोजना करताना काही ऍडव्हान्स गोष्टी केल्या. त्यामुळे करोनाच्या साखळ्या तोडण्यास प्रथमदर्शनी यश आले असे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले.यशवंतराव चव्हाण सभागृहात करोना प्रतिबंधक कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, आदी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: