आपल्या ट्विटरवरून करण जोहर ने मागितली माफी.

नवी दिल्ली, २७ एप्रिल २०२०: कोरोना विषाणूमुळे ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन लादण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सर्व सेलिब्रिटी ही त्यांच्या घरात बंद आहेत. आपल्या चाहत्यांसाठी हे सेलिब्रिटी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहेत. त्यांचे फॅन देखील त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत. बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याचेही नाव या क्रमवारीत आहे.

करण जोहर सतत आपल्या मुलांची छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. आता करण जोहरने आपल्या काही पोस्टमुळे जाहिरपणे माफी मागितली आहे. वास्तविक, करण जोहरने ट्विटरवर एक व्हिडिओ पाहिला आहे, ज्यात लॉकडाऊनमुळे लोक त्यांच्या समस्या सांगत आहेत. या व्हिडिओमध्ये ते सेलिब्रिटींचेही आभार मानत आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर करण जोहरने तो व्हिडिओ आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना करणने लिहिले की, ‘यामुळे मला खूप त्रास होतो आणि मला समजले की कदाचित माझे पोस्ट बर्‍याच लोकांच्या बाबतीत असंवेदनशील असेल. मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हे सर्व हेतूपूर्वक केले गेले नाही. मला माफ करा. करण जोहर सतत आपल्या मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत होता. मात्र, करणने आपल्या ताज्या ट्विटमध्ये शेअर केलेला व्हिडिओही खूप भावनिक आहे. व्हिडिओमध्ये डॉक्टरांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्व दाखवले गेले आहे. यांना लॉकडाऊन मुळे मोठी किंमत मोजावी लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा