कऱ्हा नदीवरील वाहून गेलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू

बारामती: सप्टेंबर महिन्यातील झालेल्या ढगफुटीमुळे नाझरे धरणातून करा नदीपात्रामध्ये ८५००० क्युसेक्सने सोडलेल्या वीसर्गामुळे मोठा पूर आला होता. यामध्ये शहरातील आप्पासाहेब मार्गालगतचा बारका पूल वाहून गेल्याने कसब्यातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.
कऱ्हा नदी वसरील वाहून गेलेल्या पुलाबाबत २२ नोव्हेंबर रोजी न्युज अनकटने याची घेतली होती. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या विद्यार्थी, महिला कर्मचारी तसेच येथील प्राचीन काशी विश्वेश्वराचे मंदिर व मशीद असल्याने मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी ये जा करण्यासाठी हा जवळचा मार्ग होता. मात्र हा पूल वाहून गेल्याने खंडोबानगर किंवा नदीवरील मोठ्या पदावरून जाण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा मारावा लागत असल्याने येथील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. याची दखल घेत ‘माझी बारामती स्मार्ट बारामती’ या अजित पवारांच्या संकल्पनेतून सचिन सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील जुना मोरगाव रोड येथील लेंडी नाल्याची स्वच्छता व रुंदीकरण केले आहे.
या
नाचे अरुंद असल्याने येथे पावसाळ्यात येणारे पाणी एकच बाप परिसरात जात असल्याने हा नाला नदीपात्रपर्यंत रुंद करण्यात आला. तसेच आप्पासाहेब पवार मार्ग लगत असणारा बारका पूल वाहून वाहून गेल्याने त्याची दुरुस्तीला सुरुवात केली आहे. लवकरच हा पूल वाहतुकीस मोकळा करणार असल्याचे तसेच या कामांमध्ये पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता ए. के. पवार,उपविभागीय अधिकारी अ.बी. जमदाडे,आर. आर.रणपिसे,स.प्र.खंडाळे ज्यांनी यंत्रसामुग्री सहा मोठी मदत केली असल्याचे नगरसेवक सुरज सातव,नगरसेवक गणेश सोनवणे,नगरसेवक संतोष जगताप यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा