कर्जत, १६ ऑगस्ट २०२०: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कर्जतमधील व्यावसायिकांनी स्वतःहुन बंद करणेबाबत चर्चा केली आहे. १७ ऑगस्ट रोजी किराणा व कृषी सेवाची दुकाने सकाळी ९ ते १ उघडे राहतील. मात्र इतर दुकाने दि. १७ ऑगस्ट पासूनच बंदच राहतील असे यावेळी सांंगीतले.
दि. १८ पासून मात्र किराणासह सर्व दुकाने पुर्णपणे बंदच राहतील असे यावेळी जाहीर करण्यात आले. या सर्व बंदमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल सेवा मात्र सुरू राहतील.
कर्जत शहर दि. १७ ऑगष्ट पासून दहा दिवस पूर्ण बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय कर्जत मधील सर्व व्यावसायिक संघटनाशी चर्चा करून निर्णय घेत असल्याची माहिती कर्जत मधील व्यावसायिक आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख पप्पुशेठ शहाणे यांनी दिली. यावेळी अर्जुन भोज, सचिन घुले, सोमनाथ कुलथे, महावीर बोरा शिवसेना व्यापारी संघटन प्रमुख यांनी माहिती दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष