कर्जत, दि. ८ जून २०२०: कर्जत तालुक्यातील नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कर्जत पंचायतीच्या वतीने नागरिकांना अर्सेनीक अल्बम हे होमिओपॅथी औषध घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे यांनी सांगितले याचा प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम देखील राबवण्यात आला आहे.
नगरपंचायतीच्या मेडिकल ऑफिसर डॉक्टर इनामदार तसेच उपनगराध्यक्ष नामदेव राऊत हे या सभेला होते. प्रतिभा भैलुमे यांनी कर्जत मधील कोरोना महामारीवर ज्या उपाययोजना केल्या त्याचा त्यांनी गोरव उद्गार आढावा सभेत सांगीतला. उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी सांगितले की व्यापारी वर्गाने देखील सहकार्य केले आहे. त्यांनी पत्रकार वर्गाचे देखील आभार व्यक्त केले आहे. कारण, त्यांनी तशी प्रसिद्धी देखील केली आहे. नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करून कोरोना वर मात करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. असे देखील त्यांनी सांगितले.
सर्वांना कोरोनाशी दोन हात करून मोठ्या हिमतीने या दिवसाना तोंड द्यावे लागणार आहे असे देखील त्यांनी सांगितले. या वेळी नगरपंचायतीचे सर्व नगरसेविका आणि नगरसेवक हे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष