कर्जत परिसरात बीएसएनएलची सेवा विस्कळीत; शिवसेनेकडून निवेदन

कर्जत, दि.१ जून २०२०: कोरोनामुळे संपुर्ण देशात ताळेबंद लागू आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामध्ये माणसांची महत्वाची जीवनावश्यक वस्तू झालेला गैजेट म्हणजे मोबाईल होय. राशिनकरांच्या या अतिमहत्वाच्या मोबाईलसाठी लागणारी गरज म्हणजे बीएसएनएलची सेवा . तीच सध्या विस्कळीत झालेली आहे . हाच मुद्दा शिवसेनेचे उप तालुका प्रमुख सुभाष जाधव यांनी ओळखला आणि भारत संचार निगम लिमिटेड कर्जतचे उपमंडल अभियंता यांना निवेदन दिले आहे.

राशिन परिसरात गेली एक ते दीड महिने भारत संचार निगम लिमिटेड यांची सेवा विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना मोबाईलच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. फोन केला असता तो पुर्ण ही होत नाही इंटरनेट सेवा बंद पडणे, जर वीज गेली तर दहा ते पंधरा मिनिटातच संपुर्ण सेवाच ठप्प होत आहे. कर्मचारी वर्ग हि फोन केल्यावर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही. या व अशा अनेक समस्या निर्माण होत असल्याने खाजगी बँक आणि इतर सरकारी कामात अडथळा निर्माण होत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते उप तालुका प्रमुख सुभाष जाधव यांनी भारत संचार निगम लिमिटेड उपमंडल अभियंता कर्जत यांना ईमेल द्वारे निवेदन देऊन लवकरात लवकर सेवा सुरळीतपणे करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा