सात महिन्यांच्या प्रसूती झालेल्या महिलेला स्व-खर्चाने सोडले घरी

राजगुरूनगर, दि.१ जून २०२०: सात दिवसाचे बाळ घेऊन एक महिला खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर उन्हाच्या झळा सोसत सुमारे चार तास बसून होती. या महिलेचा पती सात दिवसाच्या बाळाला आणि पत्नीला सोडून रुग्णवाहिका आणण्यासाठी चार तास धावाधाव करत फिरत होता. चांडोली ग्रामीण रुग्णालयपर्यंत धाव घेतली. मात्र कुठंही रुग्णावाहिका मिळाली नाही.

महिला रस्त्याच्याकडेला आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन दुपारी १२ वाजल्यापासून बसल्याची माहिती या ठिकाणी रहात असलेल्या प्रीती गवळी यांनी खेड पोलीस स्टेशनला दिली. यानंतर तात्काळ बंदोबस्त सोडून पोलीस कर्मचारी स्वप्निल गाढवे हे घटना स्थळी पोहोचले. महिला एकटी तिच्या मांडीवर ७ दिवसाचे नवजात बाळ, त्यात सातव्या महिन्यात प्रसुती झालेली ही महिला तिला आलेला अशक्तपणा. ही बाबसमोर आली.

पोलीस स्वप्निल गाढवे यांनी सरकारी रुगवाहिकेसाठी फोन लावले. मात्र एकही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णवाहिका चालक योगेश शिंदे यांना फोन करून येणारा खर्च देऊन रुग्णवाहिकेमधून या सात दिवसाच्या बाळाला जुन्नर तालुक्यातील निमगिरी येथे पाठविण्यात आले. खऱ्या अर्थाने खाकीच या सात दिवसाच्या बाळासाठी धावून आली.

दत्तात्रय गायकवाड हा जुन्नर तालुक्यातील निमगिरी येथे राहत असून दोघे ही नवरा-बायको मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात. दत्तात्रयच्या पत्नीला सातवा महिना चालू होतात. २२ मे या दिवशी तिच्या पोटात अनेक वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी निमगिरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले मात्र येथून त्यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालय, मंचर उपजिल्हा रुग्णालय येथेही उपचार न मिळाल्याने त्यांना थेट पुण्यातील ससून रुग्णालयात गाठावे लागले. त्या ठिकाणी गेल्यानंतर २३ तारखेला या महिलेची सातव्या महिन्यातच शस्रक्रिया करून प्रस्तुती करण्यात आली.

विशेष म्हणजे बाळ आणि आई दोघेही सुखरूप मात्र रुग्णालयात जागे अभावी आणि ससून रुग्णालयात कोविडचे रुग्ण असल्यामुळे या महिलेला सहाव्या दिवशीच सायंकाळी रुग्णालयातून सोडण्यात आले. सायंकाळ आणि त्यात जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था नसल्याने या नवजात बालकासह त्यांनी एक रात्र येथील वाहनतळामध्ये काढली.

दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० तारखेला पुणे- राजगुरूनगर पीएमपीएलची बस पकडून थेट राजगुरूनगर गाठले आणि पुन्हा राजगुरूनगर ते जुन्नर जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने रुग्णवाहिका शोधू लागले. मात्र चार तासानंतर ही बाब पोलीस स्वप्निल गाढवे यांना समजल्यानंतर त्यांनी शिंदे यांची रुग्णवाहिका पाहून देऊन त्या गावातील सरपंच यांच्या सोबत संपर्क करून गावातील रुग्णालयात या महिलेवर उपचार करण्यास सांगितले , घरची परिस्थिती हलाकीची , त्यात हातावर पोट , लॉकडाऊनमध्ये हाताला काम नाही. त्यामुळे आर्थिक अडचण आणि त्यात पत्नीची प्रसुती त्यासाठी जुन्नर तालुक्यातील निमगिरी ते पुणे असा प्रवास ऐकल्या नंतर स्वप्निल गाढवे आणि उपस्थितांच्या अंगावर काटा येणे स्वाभाविकच होते. मात्र कोविड१९ मुळे रुग्णालयातून सोडताना रुग्णवाहिकाही न मिळण्याने हा प्रवास या पती पत्नीला करावा लागला.

न्युज अनकट प्रतिनिधी : सुनिल थिगळे