गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा कर्जत तालुका प्रेस क्लबच्या वतीने डीवायएसपी आण्णासाहेब जाधव यांचे स्वागत

कर्जत तालुका प्रेस क्लबच्या वतीने डीवायएसपी आण्णासाहेब जाधव यांचे स्वागत

कर्जत १० ऑक्टोबर २०२०: कर्जत विभागाचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांचे कर्जत तालुका प्रेस क्लबच्या वतीने स्वागत करण्यात आले.

डीवायएसपी जाधव यांनी प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य यांच्याशी संवाद साधला.यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. किरण जगताप, उपाध्यक्ष किशोरकुमार कांबळे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब तोरडमल, ॲड. विजय सोनवणे, बंटीराजे जगताप यांनी डीवायएसपी जाधव यांचे स्वागत करत कर्जत विभागातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. कर्जत तालुक्यात गुन्ह्याचे प्रमाण जास्त असून ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी नियोजनबध्द पद्धतीने काम केले जाईल, असे जाधव यांनी यावेळी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version