गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा पिंपरी बु. येथील शिवस्मारक उद्यान विकास कामाचा शुभारंभ

पिंपरी बु. येथील शिवस्मारक उद्यान विकास कामाचा शुभारंभ

इंदापूर, १० ऑक्टोबर २०२० : इंदापूर तालुक्यातील पिंपरी बु. येथे प्रस्तावित शिवस्मारक उद्यान व परिसर सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले याचा भूमिपूजन समारंभ आज माजी बांधकाम व आरोग्य सभापती तथा पुणे जि. प. सदस्य प्रविण माने यांच्या हस्ते संपन्न झाला.

युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे तयार होत असलेल्या, या उद्यान व परिसराच्या सुशोभिकरणासाठी माने यांच्या फंडातून ८ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, लवकरच हे कार्य पूर्णत्वास जाईल. व शिवरायांच्या नावे होणाऱ्या या कामाची गुणवत्ता व दर्जा याबाबत आपण जातीने पाहणी करणार असल्याचे माने यांनी यावेळी प्रतिपादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज हे स्फुर्तीचा अखंड झरा असून, त्यांच्या नावे होत असणारे हे कामही माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी प्रविण माने यांनी व्यक्त केले.

आजच्या या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने सुरेश शिंदे सर,दत्तात्रय घोगरे, दादाभाई शेख, व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिनिधी निखिल कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version