कारखान्यात आग लागल्यानंतर स्फोट, अनेक लोक अडकले

दिल्ली: दिल्ली येथील उद्योग नगर येथील पीरागढी येथील कारखान्यात भीषण आग लागली. पहाटे चार वाजता ही आग लागली. यानंतर अग्निशमन विभागाच्या ७ वाहने आग विझविण्यासाठी पोहोचल्या. आग विझवताना कारखान्यात स्फोट झाला आणि इमारत कोसळली, ज्यात काही अग्निशमन दलासह काही लोक अडकले आहेत.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार सकाळी कारखान्याला आग लागली. या आगीची तीव्रता इतकी होती की काही क्षणात आग सर्वत्र पसरली. अपघातानंतर मोठा स्फोट झाला, त्या स्पोटाने कारखान्याची इमारत कोसळली. इमारती मध्ये काही लोक अडकले आहेत. आग विझवताना काही अग्निशमन दलाचे जवानही जखमी झाले आहेत. आज बचावकार्य चालू आहे. ही आग कशी लागली याचा अजून काही खुलासा झाला नाही.

गेल्या एका महिन्यात दिल्लीत आग लागण्याची ही तिसरी मोठी घटना आहे. सर्वप्रथम दिल्लीच्या धान्य मंडी भागात भीषण आग लागली आणि त्यामध्ये ४३ कामगार ठार झाले. यानंतर किराडी कारखान्यात भीषण आग लागली, त्यात ९ लोकांचा मृत्यू झाला. त्या नंतर सोमवारी मोदींच्या निवास स्थानाला देखील आग लागली होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा