कर्मयोगीची जैविक व सेंद्रीय खते गुणवत्तापुर्ण – आर.एस. कावळे

13

इंदापूर, १४ ऑक्टोबर २०२०: इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेली सेंद्रीय व जैविक खते ही गुणवत्तापूर्ण असून जमीनीचा पोत सुधारणा व पर्यावरणाचा समतोल राखणेसाठी अतिशय उपयुक्त असलेचे प्रतिपादन जिल्हा गुणनियंञण निरीक्षक आर.एस.कावळे यांनी कर्मयोगी कारखान्याचा खत प्रकल्पाची पाहणी प्रसंगी त्यांनी बुधवारी (दि.१४) रोजी मत व्यक्त केले.

कारखाना कार्यक्षेञातील सभासदांच्या सोयीसाठी चेअरमन हर्षवर्धन पाटील व व्हाईस चेअरमन पद्मा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नोव्हेंबर 2016 मध्ये सेंद्रीय खत प्रकल्प व एप्रिल 2017 जैविक खत प्रकल्पाची उभारणी केली असून आजपर्यंत 89,836 सेंद्रीय बॅगची व 24541 लिटर्स जैविक खतांची यशस्वीरित्या विक्री केली असल्याचे कार्यकारी संचालक श्री. बी.जी. सुतार यांनी सांगितले.

यावेळी आर.एस.कावळे म्हणाले की सहकार क्षेञात कर्मयोगीच्या उत्पादीत सेंद्रीय जैविक खतांची गुणवत्ता अग्रक्रम असून निश्चित स्वरुपात ही खते सर्वांना लाभदायक ठरत आहेत हे उत्पादीत मालाच्या गुणवत्तेवरुन दिसून येत आहे. कारखान्याने रासायनिक खत माञा कमी करुन एकात्मिक खत व्यवस्थापना अंतर्गत सेंद्रीय, जैविक पध्दतीचा अवलंब करुन जमिनीची सुपीकता अबाधित ठेवणेकरिता करीत असलेला उपक्रम हा कौतुकास्पद आहे.

यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, व सर्व खाते विभागप्रमुख उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी