कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पाकिस्तान विमानतळ ठेवणार गहाण

इस्लामाबाद (वृत्तसंस्था): दैनंदिन खर्चासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कराचीचे जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या बदल्यात सरकार तीन बँकाकडून ४५२ कोटी डॉलर्सचे (पाकिस्तानी ७० हजार कोटी रुपये ) कर्ज घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. संपत्ती गहाण ठेवून कर्ज घेण्याची ही पाकिस्तानी सरकारची पहिली वेळ नाही. यापूर्वीही जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि अन्य संस्थांकडून कर्जासाठी सरकारी रस्ते आणि सरकारी प्रसार माध्यम पीटीव्ही आणि रेडिओ पाकिस्तानच्या इमारती गहाण ठेवल्या होत्या.

जिन्ना विमानतळ सर्वात मोठे आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे विमानतळ असून, याठिकाणी २०१७-१८ मध्ये सुमारे ६७ लाख प्रवाशांची ये-जा झाली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा