टाटा मोटर्स कर्मचारी कपात करणार नाही : बटशेक

नवी दिल्ली : टाटा मोटर्स कर्मचाऱ्यांसाठी वाहन निर्मिती क्षेत्रात आलेल्या मंदीनंतरही टाटा मोटर्स आपले कर्मचारी कमी करणार नाहीत. कंपनी आपल्या पुढील काही महिन्यांमध्ये बाजारात उतरणाऱ्या नवीन प्रोडक्टच्या विश्वासावर बाजारातील सुधारणेवर आशा ठेवून आहेत.त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निर्देशक गुंटर बटशेक यांनी एका न्यूज एजन्सीला माहिती देताना सांगितले की, ऑटो सेक्टरमध्ये खूप मोठ्या काळापासून मंदी सुरू आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या कामावर टांगती तलवार तयार झाली आहे.

गुंटर बटशेक यांना विचारले गेले की, वाहन क्षेत्रामध्ये चालू असलेल्या मंदीमुळे कंपनी कर्मचारी कमी करणार आहेत का?
तर ते म्हणाले की, आमची अशी कोणतीही योजना नाही जर असे काही करायचे असते तर कंपनीने हा निर्णय आधीच घेतला असता. त्यांनी सांगितले की आम्ही बारा महिन्यापासून या संकटाशी लढत आहोत.
पुढे बटशेक यांनी सांगितले की, ते पुढील भविष्यासाठी पॉझिटिव आहेत. कंपनी पुढील काही महिन्यांमध्ये गाड्यांसोबत अन्य अनेक उत्पादने बाजारात उतरणार आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, अर्थव्यवस्था कोणत्याही दिशेला चालली असली तरी आम्ही बाजारात चांगले प्रदर्शन करून सर्व काही ठीक करू.
बटशेक यांनी सांगितले की, कंपनी चालु परिस्थिती मधून उठण्यासाठी कमर्शियल वाहन क्षेत्रात मोठ्यात मोठे पाऊल टाकत आहे. त्यांनी सांगितले की, आमच्याकडे चांगले प्रॉडक्ट आहे. आमचे डीलर नेटवर्क सुद्धा चांगले आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की भविष्यात आमची कंपनी खूप चांगले काम करेल.
यासोबतच त्यांनी चालू मंदीवर सुद्धा भाष्य केले ते म्हणाले की त्यांनी आपल्या तीस वर्षांच्या कार्यकाळामध्ये कधीही एवढे वाईट दिवस पाहिले नव्हते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा