कर्नाटक: येथील पोटनिवडणुकीत बी. एस. येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत कायम राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सोमवारी पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपने चांगली कामगिरी करत आतापर्यंत १५ पैकी ६ जागांवर विजय मिळवला आहे. तर ६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस-जेडीएसला तीन जागांवर आघाडी मिळवता आला आहे.
काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांच्या बंडखोरीमुळे भाजपने सत्तेचे स्वप्न पूर्ण केले होते.कर्नाटकच्या विजयनगर मतदारसंघातून भाजपच्या आनंद सिंह हे विजयी झाले आहेत.