गोल पोस्ट स्पॉटलाइट कार्तिक आर्यनकडे आणखी एक चित्रपट, आता मोठ्या पडद्यावर करणार ‘आशिकी’

कार्तिक आर्यनकडे आणखी एक चित्रपट, आता मोठ्या पडद्यावर करणार ‘आशिकी’

मुंबई, ५ सप्टेंबर २०२२ : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे नशीब आजकाल उंचावत आहे. ‘भूल भुलैया २ च्या अफाट यशानंतर त्याच्या एकापाठोपाठ एक सर्व चित्रपटांची घोषणा होत आहे. आता कार्तिकच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

कार्तिक आर्यन लवकरच ‘आशिकी ३’ या चित्रपटात दिसणार आहे. याविषयी त्यानं इन्स्टाग्रामवर एख व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये अरिजित सिंहच्या आवाजातील ‘अब तेरे बिन जी लेंगे हम’ हे गाणं ऐकू येत आहे. इतकेच नाही तर कार्तिक आर्यन पहिल्यांदाच अनुराग बसूसोबत काम करणार आहे. या नवीन प्रोजेक्टसाठी कार्तिक खूपच उत्सुक आहे. दिग्दर्शक अनुराग बसूला कार्तिक आर्यनसोबत काम करण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. कार्तिक आर्यनला साइन करण्याची तो आतुरतेने वाट पाहत होता.

आशिकी ३’ मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे, मात्र सध्या या चित्रपटात श्रद्धा कपूरच्या जागी कोणती अभिनेत्री झळकणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. १९९० मध्ये आलेल्या ‘आशिकी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. राहुल रॉय या चित्रपटात अनु अग्रवालसोबत दिसला होता.

या जोडीच्या चित्रपटातील गाण्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्याच वेळी, २०१३ मध्ये ‘आशिकी २’ चित्रपटाने देखील चांगली कमाई केली होती, ज्यामध्ये श्रद्धा कपूरसोबत आदित्य रॉय कपूरची जोडी दिसली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version