कोल्हापुर ५ सप्टेंबर २०२२: कोल्हापुरातील एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक रुग्ण डॉक्टरांच्याकडे तपासणीसाठी आलेला. यावेळी तो रुग्ण डॉक्टरांसमोर बसला होता. यावेळी त्या रुग्णाचे ह्रदय अचानक बंद पडले. डॉक्टरांनी लगेच समय सुचकता दाखवत या रुग्णावर उपचार करत त्याला एक प्रकारे जीवदान दिले आहे.
कोल्हापुरातील स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये डॉ. अर्जून आडनाईक यांच्यासमोरच हा प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार डॉ. अर्जुन आडनाईक यांच्या सीसीटीव्हीत देखील कैद झाला आहे. डॉ. अर्जुन आडनाईक यानी दाखवलेल्या समाज सुचकतेमुळे देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय संबंधित रुग्णाला आला आहे.
या घटनेमुळे आता संपूर्ण कोल्हापुरमध्ये डॉक्टर अर्जून आडनाईक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांचे आभार मानताना भावनिक झाले होते. या घटनेची माहिती समोर येताच संर्पूर्ण शहरात डॉक्टरांचे कौतुक होत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर
