सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स’ची विजेती कार्तिकी गायकवाडचा २६ जुलै रोजी साखरपुडा

आळंदी , ५ जुलै २०२०: आपल्या मधुर आवाजाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स’ची विजेती कार्तिकी गायकवाड हिचा साखरपुडा होणार असून ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

पुण्यातील रोनित पिसे या इंजिनिअर तरुणासोबत कार्तिकीचं लग्न होणार असून साखरपुड्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. २६ जुलैला मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पाडला जाणार आहे.

‘सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स’ची विजेती असलेल्या कार्तिकीच्या वडिलांनी पुढाकार घेवून हे लग्न जमविले आहे . कार्तिकीच्या वडिलांच्य् मित्रपरिवारातीलच एक असे पिसे कुटुंबातील रोनित पिसे याच्यासोबत कार्तिकीची लग्नगाठ बांधली जाणार आहे.

मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या रोनित पिसे याचा स्वत:चा व्यवसायही असून तो पुणे येथे स्थायिक आहे .

याआनंदाच्या क्षणी बोलताना कार्तिकी म्हणाली की, ” हे सगळं अचानक ठरलं. आमचे लग्न हे अरेंज मॅरेज असून माझ्य् वडिलांनीच हा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर देखील मी माझा संगीताचा वारसा पुढेही जपणार आहे. रोनितला देखील संगीताची आवड आहे. त्याला उत्तम तबला वाजवता येतो. त्याने तबल्याच्या तीन परीक्षा दिल्या आहेत,’ असं कार्तिकी गायकवाड म्हणाली.

दरम्यान, कार्तिकी गायवाडच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाली असली तरीही अद्याप लग्नाचा मुहुर्त ठरवण्यात आलेला नाही.

संकलन : न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा