गोल पोस्ट राष्ट्रीय कश्मीर मध्ये पाच प्रवासी मजुरांची हत्या..

कश्मीर मध्ये पाच प्रवासी मजुरांची हत्या..

कश्मीर: मंगळवारी कश्मीरमध्ये बाहेरून काम करण्यासाठी आलेल्या पाच मजुरांना आतंकवाद्यांनी ठार मारले आहे तसेच एक मजूर गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे हे पाच मजदूर पश्चिम बंगालमधील मुर्शिदापुर येथील होते. आतंकवाद्यांनी हा हल्ला युरोपियन युनियन चे प्रतिनिधी कश्मीर मध्ये भेट देण्यासाठी आलेल्या दिवशी केला जेणेकरून हे प्रतिनिधी जगासमोर कश्मीर विषयी चांगल्या वक्तव्य करू नये. मागील काही दिवसांमध्ये आतंकवाद्यांनी चार सफरचंद व्यापारी व एक मजदूर यांची हत्या केली होती आणि आता ही बातमी समोर आली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version