कात्रज घाटात ५०फूट दरीत कोसळली बस

30

पुणे : पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघालेली परिवहन मंडळाची शिवशाही बस कात्रज घाटात ५०फूट दरीत कोसळली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये ४०ते ५० प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. घटना एवढी भयानक होती की,बसने बस 2 ते 3 वेळा पलटी मारली.
या अपघातात चालकासह ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर किरकोळ जखमी झाले आहेत. मदतीसाठी
भारती विद्यापीठ आणि राजगड पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट ते सांगली प्रवाशी घेऊन जाणाऱ्या शिवनेरी बसला अपघात झाला. बस ४० ते ५० प्रवाशी घेऊन स्वारगेटवरून सांगलीला निघाली होती.
त्यावेळी कात्रजनंतर शिंदेवाडीजवळ आल्यानंतर वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. आणि बस थेट ५०
फूट दरीत कोसळली आहे.
यात ६ प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अग्निशमन दल येण्यापूर्वीच स्थानिक
नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
इतर प्रवासी जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात नेण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी राजगड पोलीस,
भारती विद्यपीठ पोलीस ठाण्याचे बिट मार्शल आणि अग्निशमन दल दाखल झाले आहे. मदतकार्य जोरात सुरू आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा