मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ आणि उरी फेम अभिनेता विकी कौशल हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगू लागल्या आहेत.
कतरिना आणि विकी अनेक ठिकाणी एकत्र पाहायला मिळाल्याने त्यांच्यात गुफ्तागु सुरु असल्याच्या बातम्या मीडियाने दिल्या आहेत.
दोघेही उद्योगपती अंबानींच्या दिवाळी पार्टीमध्ये देखील एकत्र झळकले होते. आता पुन्हा कतरिना आणि विकीला एका चित्रपट निर्मीतीच्या घरी एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.
करण जोहरच्या शोमध्ये कतरिनाने विकीसोबत एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच विकीने एका पुरस्कार सोहळ्यात कतरिनाला लग्नाची मागणीही घातली होती.
दरम्यान, या सर्व गोष्टींवरून कतरिना आणि विकीमध्ये जवळीक निर्माण होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.