कायम विनाअनुदानित शाळा अनुदानित करणार : बाळासाहेब थोरात

मुंबई: राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी पूर्वीचे प्रचलित अनुदान धोरण अंमलात आणण्याबाबत राज्य सरकार विचार करतं आहे.
या निर्णयाचा फायदा राज्यातील २१०० शाळांना होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
राज्यात विनाअनुदानित शाळांना टप्याटप्यानं अनुदान देण्याची प्रचलित पद्धत होती. मात्र ती बंद करण्यात आली आहे. विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान देण्यासाठी पूर्वीप्रमाणेच प्रचलित अनुदान धोरण अंमलात आणण्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
गेल्या ५ वर्षात राज्य सरकारकडून शाळांना फक्त 20 टक्के अनुदान देण्यात येतं होतं. अजूनही बऱ्याच शाळा अनुदानापासून वंचित आहेत.
दरम्यान, विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या आश्वासनामुळे राज्यातील 60 ते 65 हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्याबाबत दिलासा मिळणार आहे, असंही सांगण्यात आलं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा