केडीएमसीत ३१ ऑगस्टपर्यत लॉकडाऊन जाहीर.

4

कल्याण, ३१ जुलै २०२० : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी महानगरपालिकेने हॉटस्पॉट क्षेत्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवला आहे. हा लॉकडाऊन ३१ ऑगस्ट पर्यत असणार आहे असे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सांगितले आहे. ही साखळी तोडण्यासाठी केडीएमसीने ३१ ऑगस्ट पर्यंत हा लॉकडाऊन वाढवला आहे .

भारत सरकारच्या अनलॉक ३ च्या घोषणेनंतर केडीएमसीत सुद्धा आज पासून हा हॉटस्पॉट क्षेत्रात लॉकडाऊन १ ते ३१ ऑगस्ट पर्यत केला आहे. हा लॉकडाऊन रोज सायंकाळी ५ वाजेपर्यत राहील असे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.

 

हॉटस्पॉट क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांमध्ये शिथीलता असणार आहे, तसेच ” मिशन बिगींन अगेन ” हे सुरू राहील.

लॉकडाऊनमध्ये सर्व नियम ,अटी यापुर्वी प्रमाणेच राहणार आहेत. दुकाने ही ९ ते ५ या वेळेतच p1आणि p2 या सम , विषम पद्धतीनेच सुरू राहतील . केडीएमसीत अर्ध्यांहून अधिक क्षेत्र हे हॉटस्पॉट परिसरात येतात त्यामुळे सध्या हा लॉकडाऊन गरजेचा आहे . त्यामुळे मास्क घालणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा