अंधश्रद्धेचा कळस म्हणजे केजरीवाल

दिल्ली १९, सप्टेंबर २०२२ : आम आदमी पार्टीची निर्मिती ही दैवी हस्तक्षेपामुळे झाली, असा दावा आपचे प्रमुख केजरीवाल यांनी केला. २०१२ मध्ये देवी हस्तक्षेपामुळे आपची निर्मिती झाली. ज्याप्रमाणे बाळकृष्णाने अनेक राक्षसांचा संहार केला, त्याप्रमाणे आमचा पक्ष भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी अशा महाराक्षसांचा संहार करत आहे, असे विधान केजरीवाल यांनी केले.

पण या विधानात अंधश्रद्धा तर दडलेली आहे. पण या विधानातली असत्यता केजरीवाल यांनी काही काळापूर्वीच दाखवली.

दिल्लीनंतर त्यांनी गुजरात काबीज करणार असं सांगताना दिल्ली आणि गुजरातला वीज मोफत देऊ, मात्र आप’ला निवडून द्या, असं त्यांनी जाहीर केलं होतं.

पण जी गोष्ट आधीच महाग झाल्याने ती तुम्ही मोफत देण्याचे आश्वासन खोटे असल्याचे जनतेच्या लक्षात आले. किंबहुना हे केजरीवालांच्या लक्षात आल्याने त्यांनीच स्वत: हे विधान खोडून मग अशा योजना बंद केल्या. पण त्यामुळे केजरीवालांची पत कमी झाली. असं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी भाजपवर आरोप केले. गुजरातमधील आपची प्रगती आणि प्रसिद्धी भाजपला सहन होत नसल्याने भाजपने आपच्या प्रसिद्धीवर बंदी आणल्याचा आरोप आपने केला.

केजरीवाल यांना आपणच श्रेष्ठ असल्याचा मानसिक आजार असल्याचा भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले आणि अप्रत्यक्ष रित्या त्यांनी आपला टोला लगावला आहे.

त्यातून वस्तुस्थिती टाळता येणार नाही, की आम आदमी पार्टी आता गुजरातमध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करु इच्छिते. पण या सर्वात मुळात गुजरातमध्ये खिंडार पाडणं आप’ला किती जमेल, हे पहाणं गरजेचं आहे. यासाठी देवी माता आपला मदत करेल की नाही, याचा प्रत्यय येण्यासाठी देवीमातेला आणि केजरीवालांना २०२४ च्या निवडणुकीच्या निकालाची वाट पहावी लागेल हे खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा