कोरोना नाही म्हणून केली बोकड पार्टी, संपूर्ण गाव झाला क्वारन्टाईन…

11

मंगळवेढा, दि. २३ जुलै २०२०: कोरोना हा शहरा बरोबर ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात हातपाय पसरत आहे. मात्र आजही काही अशी गावं आहेत जिथे याचा शिरकाव हा झाला नाही. म्हणून तेथील गावकरी हे मस्त मजेत म्हणजे “दुनिया कोरोना कि धास्ती में, और हम आपनी मस्ती में” अशा अबीर भावात आहेत आणि हा शाहणपणा एका गावाला चांगलाच महागात पडल्याचे दिसत आहे.

लाॅकाडाऊनमधे तोंडाला चव नाही म्हणून मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदी काठच्या गावात एका कुटुंबाने बोकड कापून मटणाचा बेत आखला आणि संपूर्ण गावाला निमंत्रण दिले. आता बोकडाचे मटण आणि तेही फुकट मधे खायला मिळतंय म्हणल्यावर कोण सोडणार होते. तर जवळपास १०० पेक्षा जास्त लोकांनी या बोकडावर ताव मारण्यासाठी हजेरी लावली होती. त्यात मंगळवेढ्यातील ३ पाहुणे देखील सामील झाले होते आणि नियमांचा फज्जा उडवत मटणाचा हा कार्यक्रम पार पडला.

जो तो मटण खाऊन आत्मा तृप्त करुन आनंदी होता. पण हा आनंद फार काळ गावक-यांच्या चेह-यावर टिकला नाही.कारण मटण खायला आलेल्या ३ जणांना कोरोना असल्याची माहिती समोर आली आणि संपूर्ण गावच्या आनंदावर विरजन पडले. ” मारला बोकड पार्टीवर ताव, आता चुपचाप झाला गाव” अशी त्यांची गत झाली.

या विषयी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर यांच्याशी बोलणे झाले असता ते म्हणाले की आम्ही चौकशी करत आहेत आणि या पुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. असेही त्यांनी सांगितले. तर संपूर्ण गावालाच आता क्वारन्टाईन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी